नगर - श्री.ब्रम्हचैतन्य गोंवदलेकर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शिलाविहार येथील रिंगणेतेवा यांच्या निवासस्थानी असलेल्या मंदिरात शुक्रवा...
नगर - श्री.ब्रम्हचैतन्य गोंवदलेकर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शिलाविहार येथील रिंगणेतेवा यांच्या निवासस्थानी असलेल्या मंदिरात शुक्रवार दि.12 फेब्रु.2016 पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे हरिनाम सप्ताहाने प्रारंभ होत आहे.
या सप्ताहात पहाटे 5 ते 7 रुद्राभिषेक, 9 ते 11 श्री च्या चरित्र ग्रंथाचे वाचन, 11 ते 12 भजन दुपारी 12 वा. आरती झाल्यावर महाप्रसाद होईल. दुपारी 3 ते 6 भजन सायं 6 ते 7 हरिपाठ, रात्री पुन्हा महाप्रसाद होऊन 9 ते 10 पंचपदी भजन होईल. 24 तास अखंड नामजप होणार असून सेवाभावी मंडळाचे भक्त प्रत्येकी 1 नाव असे 24 भाविक अखंड नामजपान बसणार आहेत.
ज्या भाविकांना पारायणास बसायची त्यांनी विजय मते (9225322389) संपर्क साधावा म्हणजे ग्रंथ उपलब्ध करता येईल.
सप्ताहाची सांगता शुक्रवार दि.19 फेब्रु.2016 रोजी सकाळी 8 ते 9 श्रीं ची मिरवणूक काढण्यात येईल. 9 ते 11 ह.भ.प. दत्तात्रय महाराज जगताप (केडगांव) यांचे काल्याचे किर्थन होऊन महाप्रसादाने मांगता होईल. तरी भाविकांनी सप्ताहातील अखंड नामजप, पारायण, आरती महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुंदरदास रिंगणे व सौ.रेखाताई रिंगणे यांनी केले आहे.










