हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळा, बाग़डपट्टी विभागाचे 5 विद्यार्थी शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत जि्ल्हास्तरीय गुणव...
हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळा, बाग़डपट्टी विभागाचे 5 विद्यार्थी शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत जि्ल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले. विशाल संजय अरुण (260) 16 वा, सानिया मुश्ताक शेख (256) 18 वा, रेणुका भि्माशंकर काकडे (254) 19 वा, नेहा कलिम शेख (250) 21 वा., ओम लालासाहेब बेल्हेकर (250) 21 वा., या इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले, सदर विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका सौ.पोतदार विद्या, सौ.ब्रम्हे गौरी, सौ.देशपांडे अर्चना व मुख्याध्यापक उरमुडे विठ्ठल यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन अॅड.संपतलाल बोरा यांनी आपल्या मनोगतामध्ये गेल्या 10 वर्षापासून शाळासतत स्पर्धापरीक्षेमध्ये यश मिळवते याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष मा.मधुसुदन मुळे, कार्य़ाध्यक्ष संजय जोशी, मानद विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाप्रसंगी सिताराम सा़रडा विद्यलयाचे मुख्याध्याक भांगरे सर पर्यवेक्षक सोनवणे सर उपस्थित होते.










