नगर - शिवजयंतीनिमित्त अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ व मखदुम सोसायटी यांच्यावतीने शुक्रवार 19 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 9 ते सायं.6 वाजेपर्य...
नगर - शिवजयंतीनिमित्त अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ व मखदुम सोसायटी यांच्यावतीने शुक्रवार 19 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 9 ते सायं.6 वाजेपर्यंत माणिक चौक येथील आदर्श शाळेमध्ये जुन्या दुर्मिळ नाण्यांचे तसेच शिवकालिन किल्ल्यांच्या फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान यानी दिली.
या प्रदर्शनात शिवकालीन, निजामशाही कालीन, मोगल कालीन दुर्मिळ नाण्यांचा समावेश असून, तसेच शिवकालीन किल्ले व विविध ऋतूमधील किल्ल्यांच्या फोटोचे भव्य प्रदर्शन लावण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा नगरकरांनी व इतिहासप्रेमींनी लाभ घ्यावा, व आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून घ्यावी, असे आवाहन इतिहासप्रेमी मंडळाचे सचिव बहिरनाथ वाकळे यांनी केले आहे.










