नगर- अहमदनगर शहरात काही परवानाप्राप्त ऑटोरिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेतात. ऑटोरिक्षा परवान्यानुसार तीन प्रवासी वाहून ने...
नगर- अहमदनगर शहरात काही परवानाप्राप्त ऑटोरिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेतात. ऑटोरिक्षा परवान्यानुसार तीन प्रवासी वाहून नेण्याची परवानगी आहे. तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांवर नियमाप्रमाणे दंडात्मक कार्यवाहीची मोहीम सुरु करण्यात येत आहे. तसेच पवानाप्राप्त ऑटोरिक्षा चालकांकडे नाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, इन्शुरन्स्, परवाना, पी.यू.सी. तसेच चालकांचे वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती बॅज हे कागदपत्रे कायद्यान्वये असले पाहीजे.
तसेच सर्व परवाना प्राप्त ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर असणे कायद्यान्वये बंधन कारक आहे. ऑटोरिक्षा चालकांनी मीटर प्रमाणेच वाहन चालवून भाडे आकारणी करावी. ऑटोरिक्षात बसणाऱ्या प्रवाशांनी देखील मीटर डाऊन करण्याचा आग्रह धरुन मीटर प्रमाणेच पैसे द्यावे. ऑटोरिक्षा चालकाने कायद्यानुसार गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी आवाहन केले आहे.










