अहमदनगर येथील युवा सेने तर्फे प्रमुख महामंडळास पत्र देवुन कळविले आहे की, अहमदनगर एम आय डी सी तील उद्योजकांचे कारखान्यामधुन दुषित व केम...
अहमदनगर येथील युवा सेने तर्फे प्रमुख महामंडळास पत्र देवुन कळविले आहे की, अहमदनगर एम आय डी सी तील उद्योजकांचे कारखान्यामधुन दुषित व केमिकलयुक्त पाणी निंबळक येथील पाझरतलावात सोडवीत आहेत. .यामुळे स्नेहालया शेजारील ओढ्यामधुन पाणी तालावास येत आहे. यामुळे येथील शेतजमीन व जनावरास हानीकारक आहे. तरी याबाबत तातडीने उद्योजकांची व कारखानदारांची चौकशी करुन तातडीने कार्यवाही करण्यात यावी तसेचज निंबळक ग्रामपंचायत मधील ग्रामसभा दि. 26-1-2016 याबाबतचा ठराव घेतलेला आहे. याबाबत चौकशी करुन तातडीने कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन 15 दिवसांत करण्यात येईल. असे युवासेना नगर तालुकाअध्यक्षांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.