अहमदनगर - पिंपळगांव वाघा ता.नगर येथे आज सकाळी बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. शेतकरी रावसाहेब पाटिलबा वाबळे हे आपल्या शे...

अहमदनगर - पिंपळगांव वाघा ता.नगर येथे आज सकाळी बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. शेतकरी रावसाहेब पाटिलबा वाबळे हे आपल्या शेतामध्ये मका कापत असतांनाच अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला करुन जखमी केले. रावसाहेब वाबळे यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वनविभागाकडून बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा असे गावकऱ्यांनी मागणी केली आहे. ही घटना आज सकाळी घडली.









