अहमदनगर वाचन चळवळीला उज्वल परंपरा असून अनेक आव्हाने काळाचे ओघात उभी ठाकली आहेत. तथापी त्यांना सामोरे जाऊन वाचन चळवळीला वैभव मिळवून देण्या...
अहमदनगर वाचन चळवळीला उज्वल परंपरा असून अनेक आव्हाने काळाचे ओघात उभी ठाकली आहेत. तथापी त्यांना सामोरे जाऊन वाचन चळवळीला वैभव मिळवून देण्यासाठी सरकार प्रशासन आणि ग्रंथालयाच्या समन्वयातून दिशा देण्याची गरज असल्याचा सुर परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
जिल्हा ग्रंथोत्सव 2016 मध्ये वाचन चळवळीपुढील आव्हाने आणि सार्वजनिक ग्रंथालयाची जबाबदारी या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आळेले होते. यावेळी जिल्हा भरातून चळवळीतील मान्यवर व्यक्तींनी चळवळी पुढील आव्हान, समस्यांचा उहापोह केला. ग्रंथालयाची जबाबदारी, चळवळीचा विस्तार व विकास करण्याची असून शासनाने सुध्दा त्यांच्या समोरील अडचणी व समस्यांचे सकारात्मक दृष्टीकोनातून विचार कारायला हवा. ग्रंथालयांना बळ दिल्यास त्या चळवळीला गती मिळू शकेल असे बहुतांशी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रंथ मित्र मुरलीधर नवाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सुभाष मुंढे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरस, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, ग्रंथालयांचे निरीक्षक संपत वाकचौरे, संदिप काते, सुरेश हराळ, विजय डोळ, मिराताई काकडे, नामदेव गरड, पोपट सांगळे, संदिप नन्नवरे, संभाजी पवार, अनिल पवार आदींनी परिसंवादात सहभाग घेतला.










