नगर | नगरतालुक्यात आजमितीला १३ गावे आणि ७७ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तालुक्यात ८४ गावांची खरीप आणेवारी ही ५० पैशांपेक...

नगर | नगरतालुक्यात आजमितीला १३ गावे आणि ७७ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तालुक्यात ८४ गावांची खरीप आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. तालुक्यात असणाऱ्या घोसपुरी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुष्काळात सुरू असल्याने सुमारे ४७ गावांना या योजनांद्वारे पाणी पुरवठा होत आहे. या योजनेच्या जलवाहिन्या या वाड्या-वस्त्यांवर पोहोचल्या नाहीत. सध्या आठवड, बाबुर्डी बेंद, खडकी, वाळकी, हिवरे झरे, गुणवडी, राळेगण म्हसोबा, सांडवे, मांडवे, रुई छत्तीसी, धनगरवाडी, माथणी, दशमी गव्हाण, इमामपूर, जेऊर, पारगाव-भातोडी, चिचोंडी पाटील गावांसह ७७ वाड्या- वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे.









