नगर - आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाच्यावतीने कै.वै.पं.गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे संस्थापक वैद्य गंगाधर शास्त्री गुणे यांच्या 65 ...
नगर - आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाच्यावतीने कै.वै.पं.गुणे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे संस्थापक वैद्य गंगाधर शास्त्री गुणे यांच्या 65 व्या पुण्यतिथींनिमित्त शनिवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. ग्रंथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संगीता निंबाळकर यांनी दिली. स्व.गुणे शास्त्री यांनी आय़ुर्वेदामधील अनेक मार्गदर्शक ग्रंथ लिहिली आहेत. त्यांच्या पुण्यतिथी्चे औचित्य साधून त्यांच्या ग्रंथांचे पुजन करुन आयर्वेद कॉलेज ते विशाल गणपती मंदिरापर्य़ंत वाजत-गाजत पारंपारिक पध्दतीने ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. आ.अरुण जगताप यांच्या हस्ते गुणे शास्त्रींच्या समाधीचे पूजन होऊन ग्रंथ दिंडीस प्रारंभ होणार आहे. यावेळी आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, संस्थेचे सचिव डॉ.विजय भंडारी, उपाध्यक्ष डॉ.विक्रम देवचक्के, स्थायी समिती सभापती गणेश भोसले, सभागृहनेता कुमार वाकळे, महिला बालकल्याण सभापती नसिम शेख, उपसभापती कलावती शेळके, नगरसेवक कैलास गिरवले, स्वप्नील शिंदे आदिंसह आय़ुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे सर्व संचालक महाविद्यालतील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग उपस्थित राहणार आहेत.









