नगर - अहनदनगर शहर बार असोसिएशनच्या 2016 करीता नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अध्यक्षपदी अॅड.लक्ष्मण बबन कच...
नगर - अहनदनगर शहर बार असोसिएशनच्या 2016 करीता नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अध्यक्षपदी अॅड.लक्ष्मण बबन कचरे, उपाध्यक्ष अॅड.संदिप म्हस्के, सचिव अॅड.लक्ष्मीकांत पटारे, सहसचिव अॅड.निलेश हराळे, महिला सहसचिव अॅड.वृषाली तांदळे-काळे, कार्यकारिणी सदस्य- अॅड.मिनाक्षी कराळे-सावंत, अॅड.गौरव दांगट, अॅड.योगेश तोडमल, अॅड.प्रविण पालवे, अॅड.योगेश गेरंगे, अॅड.वसिम सय्यद, अॅड.अनिल भापकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कल्याण पागर यांनी काम पाहिले.
या नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्विकारला असून, या सर्वांचे अॅड.विश्वासराव आठरे, अॅड.चैतन्य आठरे, अॅड.सचिन बबर, अॅड.अमृता दळवी, अॅड.के.एम.देशपांडे, अॅड.जयवंत भापकर, अॅड.अशोक कोठारी यांच्यासह बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी अभिनंदन केले आहे.










