नगर- दरेवाडी/तुक्कडओढा येथील पै.सुभाष किसन करांडे यांना नुकताच जिल्हा परिषद, अ.नगरच्या वतीने देण्यात येणारा आदर्श गोपालक पुरस्कार ज...
नगर- दरेवाडी/तुक्कडओढा येथील पै.सुभाष किसन करांडे यांना नुकताच जिल्हा परिषद, अ.नगरच्या वतीने देण्यात येणारा आदर्श गोपालक पुरस्कार जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, पुनम भिंगारदिवे, बाजीराव गवारे, पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले, उपसभापती शरद झोडगे, डॉ.राजळे, डॉ.थोरात, भोगाडे आदि उपस्थित होते.
पै.सुभाष करांडे यांचा जनावरांचा गोठा हवेशीर, शेण, गोमुत्र व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. दिवसभरातून दोन गोठा स्वच्छ केला जातो व हाताने दुध काढण्याची पध्दत आहे. या सर्व बाबींचा दखल घेवून त्यांना जिल्हा परिषद अ.नगरच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पवनपुत्र कला व क्रिडा मित्र मंडळ, पै.सुभाष करांडे मित्र मंडळ, गांधी मैदान दुग्ध व्यावसायिक व मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










