अजय फौंडेशन व समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित जागतीक कर्करोग दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन, रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी प्रसंगी...
अजय फौंडेशन व समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित जागतीक कर्करोग दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन, रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी प्रसंगी, विद्या तन्वर, मंदाताई भिंगारदिवे, विजय मिसाळ, करीष्मा शेख, चित्रा ठाणगे, गणेश भुसा, तारा वहीरम, फरीम पठाण, राहुल खरात कृष्णकुमारी, लालौमसेन रंजना कडीले, बेबी भिंगारदिवे, कुऱ्हे, दुसुंगे आदी.
नगर - आज धावळीच्या, युगात अनेक व्यक्ती विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलेला आहे. व्यसनांच्या विळख्यामुळे कॅन्सरसारख्या भयानक आजाराला आमंत्रण देत आहे. व्यसने युवा, पुरुष, तंबाखू, बीडी, दारु, ड्रग्ज, (औषधे) तर महिला व युवतीही फॅशन म्हणून सिगारेट, अल्कोहोल, तंबाखुची मिसरी, आदीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेकडे वळत आहे. दुःख झाले, नेराश्य आले, कामाचा ताण वाढला, आनंद झाला, वाढदिवस, लग्न व विविध पार्टी आदिमध्ये सुरवात होऊन सवयच लागते. यातून विविध कौटुंबिक समस्या, तंटा, अपघात घडतात. अमुल्य असे शरीर व्यसनांमुळे पोखरुन जाते व मुत्यू, अपंगत्व, नपुंसकत्व, दुर्धर आजार, बळावतात. कुटूंब सुरक्षित ठेवायचे असेल तर व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परीणामाची माहिती असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अजय फौंडेशन व समाजकार्य महाविद्यालय आयोजित जागतीक विद्या तन्वर यांनी केले.
याप्रसंगी कापुरवाडीच्या सरपंच मंदाताई भिंगारदिवे जयंत युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय मिसाळ, क्षेत्रीय पर्यवेक्षिका प्रेरणा विधाते, समाजकार्य महाविद्यालयाच्या करीष्मा शेख, चित्रा ठाणगे, तारा वहीरम, फरीम पठाण, राहुल खरात, कृष्णकुमारी लालौमसेन, अंगणवाडी सेविका रंजना कर्डिले, बेबी भिंगारदिवे, कुऱ्हे, दुसुंगे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी परीसरातील अनेक युवती महिलांनी आरोग्य मार्गदर्शनाचा, रक्तगट, हिमोग्लोबीन तपासणीचा लाभ घेतला.










