मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केली बाबांची गीते, प्रार्थनेनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप नगर - मेहेरबाबांचा१...
मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केली बाबांची गीते, प्रार्थनेनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप
नगर - मेहेरबाबांचा१२२ वा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी शहरातील सरोष पेट्रोलपंपाशेजारील मेहेरबाबा केंद्रात जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मेहेरबाबांचा जयघोष करत बुधवारी पहाटे पाच वाजता जन्मोत्सवाला प्रारंभ झाला. शहरासह देश-विदेशातील भाविक यावेळी उपस्थित होते. उपस्थित भाविकांनी बाबांची विविध भाषांमधून गीते सादर केली, तर मेहेरनाथ कलचुरी यांनी बाबाचे कार्य, त्यांचा पाच अाध्यात्मिक गुरुंविषयी माहिती दिली. शिर्डीच्या साईबाबांनी मेहेरबाबांच्या भेटीत त्यांना पर्वरदिगार का म्हटले, याची माहिती दिली. मेहेराबादच्या मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी बाबांची गीते सादर केली. आरती प्रार्थनेनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
२२ फेब्रुवारीपासून जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला अाहे. २८ फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. रमाबाई कलचुरी याच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचे अनावरण करून जन्मोत्सवास प्रारंभ करण्यात आला होता. शहरातील मेहेरबाबा केंद्रात दररोज रात्री जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत असून त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेहेरनाथ कलचुरी, दीपक थाडे, मधुकर डाडर आदींनी केले आहे.










