नगर - नगर अर्बन बँकेच्या कार्यक्रमासाठी जानेवारी महिन्यात येणार होतो. मात्र तेलंगणा राज्याची अचानक महत्वाची जबाबदारी आल्याने बेलापूरव श्र...
नगर - नगर अर्बन बँकेच्या कार्यक्रमासाठी जानेवारी महिन्यात येणार होतो. मात्र तेलंगणा राज्याची अचानक महत्वाची जबाबदारी आल्याने बेलापूरव श्रीरामपूर शाखेच्या लोकार्पण सोहल्यास येऊ शकलो नाही. त्यामुळे आज मुद्दाम अर्बन बँकेला भेट देण्यासाठी आलो आहे. बँकेची प्रगती व मोठी वास्तू पाहून समाधान वाटते. 106 वर्ष बँक चालवणे आजच्या काळात सोपे नाही. बँकेच्या संस्थापकांच्या पुण्याईने व संचालकांच्या प्रामाणिक कारभारामुळे एव्हढे वर्ष बँक यशस्वीपणे चालत आहे. शुन्य एन.पी.ए. राखून लाभांशही बँक चांगला देत आहे. या बँकेने सर्वसामान्य योगदान कौतुकास्पद आहे. केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून बँकेचे मी अभिनंदन करत आहे. भारतात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासाच्या शिखरावर जाणार आहे. जे बोलतात ते प्रत्यक्षात करुन दाखवत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय खत व रासायनिक मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
यावेळी चेअरमन खा.दिलीप गांधी त्यांचे स्वागत करुन पांडूरंग रुक्मिणी देवेतच्या मुर्ती देवून सत्कार केला. वैकुंठभाई मेहता सभागृहात झालेल्या या सत्कार सोहळ्यास बँकेचे व्हा.चेअरमन शैलेश मुनोत, संचालक अशोक कटारिया, किशोर बोरा, अजय बोरा, राजेंद्र अग्रवाल, अॅड.केदार केसकर, मिनष साठे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, बँकेच मुख्य व्यवस्थापक नवीन गांधी, सहाय्यक व्यवस्थापक एन.पी.साळवे, प्रशासकीय अधिकारी विलास बडवे, राजेंद्र रोकडे, नगरसेवक सुवेंद्र गांधी आदींसह बँकेच्या 48 शाखांचे मॅनेजर उपस्थित होते.
चेअरमन खा.गांधी म्हणाले, आज अचानक ना.हंसराज अहीर यांनी सर्वसामान्य कुटुंबातून येऊन मतदार संघाचे त्यांनी नेतृत्व केले आहे. सातत्याने संसदेत अभ्यासपुर्ण भाषण व मुद्दे मांडल्याने त्यांना आदर्श संसदपटू पुरस्कार मिळाला आहे. अशा अभ्यासू नेतृत्वाने अर्बन बँकेला भेट दिल्याचा मोठा आनंद अर्बन बँक परिवाराला होत आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्हा.चेअरमन शैलेश मुनोत यांनी बँकेच्या कार्य़ाचा आढावा घेत प्रगतीची सविस्तर माहिती दिली. चेअरमन खा.दिलीप गांधी व ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक अशोक कटारिया यांनी केले. तर आभार अजय बोरा यांनी मानले.










