अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलीत सर सय्यद अहमद खान उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मातोश्री उर्दु हायस्कुल व अलहाज शेख अब्दुल अज...

अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलीत सर सय्यद अहमद खान उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मातोश्री उर्दु हायस्कुल व अलहाज शेख अब्दुल अजीज उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स् अॅण्ड कॉमर्स, आलमगीर, नागरदेवळे, ता.जि.अहमदनगर येथे सालाबादप्रमाणे यावर्षी मंगळवार दि.15-2-2016 रोजी उर्दु सप्ताहाचे संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करुन सुरु करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यीनींनी आपल्या विचारात कवी डॉ.अल्लामा इकबाल, मिर्झा गालिब, मुन्शी प्रेमचंद, आमीर खुसरो यांच्याबद्दल आपले विचार प्रकट केले.
या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शेख जमीर सर व अफसाना बाजी यांनी केले. सुत्रसंचालन खान निशात बाजी व महेनाज बाजी यांनी केले. शेवटी एजाज सर यांनी आभार मानले.









