नगर - विविध वाद्यांची जुगलबंदी, उपस्थितांना ठेका धरायला लावणारे, ढोलक, बॅन्जो, तबला व हार्मोनियमचे सूर व त्या जोडीला सुरेख, कर्णमधूर आवा...
नगर - विविध वाद्यांची जुगलबंदी, उपस्थितांना ठेका धरायला लावणारे, ढोलक, बॅन्जो, तबला व हार्मोनियमचे सूर व त्या जोडीला सुरेख, कर्णमधूर आवाजातील कव्वाली गायकांचे स्वर, असं मंत्रमुग्ध करणारं वातारवण होतं एमआयडीसीतील श्रीक्षेत्र दत्त मंदिरातलं, उत्तर रात्रीपर्यंत रंगलेल्या या कव्वालीच्या कार्यक्रमातून धार्मिक एकतेची आणि मनोभावे भक्तीची अनुभूती उपस्थित भाविकांना आली.
एमआयडीसीतील दत्त मंदिरात मंगल भक्त सेवा मंडळाच्यावतीने श्री.विश्वेश्वर महाराज उर्फ राजाभाऊ कोठारी यांच्या वाढदिवसानिमत्त सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील गुलाम-चिश्ती कव्वाल शाकीर व जाकीर यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कव्वाल शाकीर व जाकीर यांच्या पहाडी आवाजाने व त्यांना तबला ढोलक, हार्मोनियम, बॅन्जोची संगीत साथ देणाऱ्या सहकलाकारांनी आपल्या कला कौशल्याचे अप्रतिम सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत ठेका धरायला लावले. कव्वाल गायकांनी या कार्यक्रमात सर्व धर्मिय एकतेचे दर्शन घडविले.










