रिमलबाई भंडारी यांचे निधन नगर- नगर येथील भवानीनगरमधील जैन समाजातील जेष्ठ महिला रिमलबाई मदनलाल भंडारी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने न...
रिमलबाई भंडारी यांचे निधन
नगर- नगर येथील भवानीनगरमधील जैन समाजातील जेष्ठ महिला रिमलबाई मदनलाल भंडारी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्व.रिमलबाई भंडारी यांच्या पश्चात मुलगा मनोज, सून, निलिमा व निता या विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. मनोज टोबॅकोचे मनोज भंडारी यांच्या त्या मातोश्री तर साजन सजनीचे रमण व सुभाष भंडारी यांच्या त्या चुलती होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भिमराव कर्डीले यांचे निधन
नगर- बुर्हाणनगर येथील प्रगतशील शेतकरी भिमराव रमाजी कर्डीले यांचे बुधवार दि.24 फेब्रु. 16 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले ते 72 वर्षांचे होते.
बुर्हाणनगर येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या मागे पत्नी 1 मुलगा, 1 मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नगर तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष मच्छिंद्र कर्डीले यांचे ते वडील होत.











