नगर-पुणे येथील निवृत्त विंग कमांडर यशवंत मराठे यांच्या नेतृत्वाखालील पुण्याच्या सायकल प्रतिष्ठानचे 18 सदस्य नुकतेच पुणे-शिर्डी या स...
नगर-पुणे येथील निवृत्त विंग कमांडर यशवंत मराठे यांच्या नेतृत्वाखालील पुण्याच्या सायकल प्रतिष्ठानचे 18 सदस्य नुकतेच पुणे-शिर्डी या सायकल यात्रेनिमित्त नगरला आले होते. यातील स्वतः मराठे हे तब्बल 85 वर्षाचे आहेत. या रॅलीचे स्वागत नगर शहरातील मानवाधिकार जनआंदोलन संघटनेच्यावतीने कऱण्यात आले. याप्रसंगी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, श्रीनिवास बोज्जा, शैलेश राजगुरु तसेच जनआंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, प्रदेश सरचिटणीस अंजली वल्लाकट्टी, प्रदेश उपाध्यक्ष संध्याताई मेढे, जिल्हाध्यक्ष सोले साहेब, संपर्क प्रमुख सोनवणे साहेब, जिल्हा सचिव जाधव मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती दांडगे व संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष जितेंद्र वल्लाकट्टी, सचिव नितीन लिगडे, रवि किरण भुतकर, अमित भुतकर, यश लिगडे आदि उपस्थित होते.
यावेळी यशवंत मराठे म्हणाले, सायकल चालवा, इंधन वाचवा, प्रर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन आम्ही ही रॅली काढली आहे, ठिकठकाणी यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगरमध्ये मानवाधिकार जनआंदोलनाच्या वतीने आमचे स्वागत करुन आमचा उत्साह वाढविला आहे.
यावेळी ऑलेंपिक कुस्तीपटू सुवर्णपदक विजेत्या अंजली वल्लाकट्टी-देवकर, जितेंद्र वल्लाकट्टी, संध्या मेढे यांनी रॅलीस झेंडा दाखवून पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी बापूसाहेब पोतदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.










