नगर - जिल्हाधिकारी कार्यालयाने आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती यांचे सर्वांगीन उन्नतीकरीता सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागामार्फत य...
नगर - जिल्हाधिकारी कार्यालयाने आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती यांचे सर्वांगीन उन्नतीकरीता सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी केलेली आहे. यामध्ये भूमिकेत बेघरांचा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत समावेश करावा व त्याबाबत मा.मुख्यमंत्र्यांना कळवावे असी मागणी मानवता जन आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.भानुदास होले यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन देताना केली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अनिक कवडे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदिंच्या उपस्थितीत मानवता जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाथरे, प्रदेश पाथरे, प्रदेश अध्यक्ष अॅड.भानुदास होले, प्रदेश कार्याध्यक्ष अॅड.महेश शिंदे, प्रदेश संघटक पोपटराव बनकर, जिल्हा संघटक विजय मिसाळ, प्रसाद भडके, मोहन दादा ठोंबे, रमेश आल्हाट सर, अनिल ओहोळ, रविंद्र पगारे, सुधाकर कदम आदी शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन दिले.










