न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज अहमदनगरची कला शाखेतील विद्यार्थीनी कु.श्वेता गवळी हिने गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या दक्षिण आशियाची...
न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज अहमदनगरची कला शाखेतील विद्यार्थीनी कु.श्वेता गवळी हिने गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या दक्षिण आशियाची क्रीडा स्पर्धेत खो-खो मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतांना सुवर्णपदकाची कामगिरी केली. सुवर्णकन्या श्वेता गवळीचा सत्कार अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने करण्यात आला. कु.श्वेता गवळी ही अहमदनगर जिल्ह्याचे भूषण आहे. दि. 6 ते 9 फेब्रुवारी 2016 दरम्यान स्पर्धेत खेळतांना पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश यांच्या संदर्भात खेळून, सेमीफाईनल श्रीलंका बरोबर झाली. तर फाईनल बांग्लादेश विरुध्द भारत अशी झाली. तीला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहे. 12 वर्षाखालील खेळाडूंचा जानकी पुरस्कार 14 वर्षाखालील खेळाडूंचा वीरबाला पुरस्कार व महाविद्यालय गटातील राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
न्यू आर्टस् महाविद्यालयात सकाळी कु.श्वेता गवळीची संपुर्ण महाविद्यालयात घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. अत्यंत जल्लोषात एन.एस.एस.पथकाने ढोल लेझिम वाजत तीचे स्वागत केले.










