नगर-नगरच्या क्रिकेटला वाव देऊन सातत्यपूर्ण ट्रॉफी भरविणारी क्रॉप्टन कंपनी व अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित 30 व्या राज्यस्तरीय...
नगर-नगरच्या क्रिकेटला वाव देऊन सातत्यपूर्ण ट्रॉफी भरविणारी क्रॉप्टन कंपनी व अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित 30 व्या राज्यस्तरीय क्रॉम्प्टन करंडक क्रिक्रेट स्पर्धेचे उदघाटन बुधवार दि. 3 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. माजी भारतीय क्रिकेट कसोटीपटू इकबाल सिद्दीकी यांच्या हस्ते वाडिया पार्क मैदानावर होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष आ. अरुण जगताप हे असणार आहेत. यंदा ही स्पर्धा राज्यस्तरीय होत असून, 19 वर्षाखालील खेळाडूंसाठीच खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, परभणी व नगर जिल्ह्यातील 32 संघांनी भाग घेतला आहे. उदघाटनप्रसंगी आदर्शगाव प्रणेते व समाजसेवक पोपटराव पवार, आ. संग्राम जगताप, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले व क्रॉम्प्टन ग्रिव्हीज एलव्हीआरएमचे उपाध्यक्ष सजल मुखर्जी तसेच जिल्हा क्रिकेट असो.चे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उदघाटन सामना नेरळकर अॅकेडमी (औरंगाबाद) विरुद्ध व्हीस्डम अॅकेडमी (पुणे) यांच्यात होणार आहे. तरी नगरमधील सर्व आजी-माजी क्रिकेटपटू, रसिक खेळाडू व नगरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन असो. चे सहसचिव प्रा. माणिक विधाते, क्रॉम्पटन ग्रिव्हीजचे डेप्यु. जन. मॅनेजर प्रदीप आरोटे व राजेंद्र कंकाळ यांनी केले आहे.









