नगरकरांच्या मनोरंजनासाठी आनंद मेला ही पर्वणीच - संभाजी कदम नगर - घडाळ्याच्या काट्याप्रमाणे प्रत्येकाचे जीवन न थांबता कार्यरत आहे....
नगरकरांच्या मनोरंजनासाठी आनंद मेला ही पर्वणीच - संभाजी कदम
नगर - घडाळ्याच्या काट्याप्रमाणे प्रत्येकाचे जीवन न थांबता कार्यरत आहे. 24 तासही कामासाठी अपुर्ण पडतात अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. केवळ काम आणि तणावामधून दिलासा मिळण्यासाठी नागपूर येथील जैस्वाल बंधूनी नगरकरांच्या मनोरंजनासाठी आनंद मेला ही एक पर्वणीच दिल आहे. असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केले.
सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवरील तांबटकर मळा येथे फन अॅण्ड फेअर डिजनी लॅंड चा शुभारंभ श्री कदम यांच्या हस्ते फीत कापून व नारळ फोडून कऱण्यात आला. यावेळी ते बोलेत होते. या शुभारंभास नगरसेवक विक्रम राठोड, योगीराज गाडे, माजी नगर सेवक नितीन शेलार , अनिल गीते, प्रकाश पालवे, बापुसाहेब आव्हा़ड, बबन आव्हाड, सुधीर पोटे, सुमित वटुळे, रेवजी नांगरे, शिरीष जानवे आदि उपस्थित होते.










