संपदा ट्रस्ट अहमदनगरच्या वतीने संपदा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून युवक/शेतकरी यांचे करीता महाराष्ट...
संपदा ट्रस्ट अहमदनगरच्या वतीने संपदा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून युवक/शेतकरी यांचे करीता महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सी.सी.इन शेली व मेंढीपालन 6 महिन्यांचा कोर्स मागील वर्षापासून सुरु करण्यात आलेला आहे. या कोर्सला महाराष्टर् राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबईची मान्यता आहे.
शेतीपूरक आणि नफा देणारा व्यवसाय म्हणजे शेळी-मेढीपालन हा व्यवसाय होय. आपल्या देशात शेळ्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत खूप मोठी आहे. त्यामुळे शेळी-मेंढीपालनासारखे जोडधंदे भारतात मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत. पर्य़ायाने ग्रामीण भागाचा विकास होत आहे. कमीत कमी जागेत आपण आपले उत्पन्न व नफा कसा वाढवू शकतो, याविषयी शेळी व मेंढी पालनाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये शेळी-मेंढीच्या जातीची निवड कशी करावी, त्यांचे खाद्य, रोगराई नियंत्रण, आधुनिक पध्दतीचा निवारा कसा असावा, शेळी-मेंढ्यांचे लसीकरण व बंदिस्त शेली पालनाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यवसायाच्या आधुनिक आणि सुधारित वैज्ञानिक पध्दती, शासनाच्या विविध कर्जयोजना, अनुदान यासंबंधी संपू्र्ण माहिती दिली जाणार आहे.
एक गाय किंवा म्हशीच्या खर्चात 5-6 शेळ्या सहज पाळता येतात. शेळ्यांच्या दोन वेतातील अतंर कमी असल्यामुळे आर्थिक उत्पन्न जास्त मिळू शकते. हा कोर्स स्वयंरोजगार/व्यवसायाभिमुख असल्यामुळे कौशल्यासह उद्योजकता विकास, शासनाच्या बँकांच्या विविध योजना प्रकल्प अहवाल इ.बाबी या कोर्स सोबत शिकविल्या जाणार आहेत. वरील कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्याकरिता संपदा बिल्डींग मार्केट यार्डच्या पाठीमागे, अहमदनगर या पत्त्यावर किंवा मो.न.9403693424/ 9404953639 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.










