नगर - एक्साईज इंजिनिअरींग लि.कंपनीने नेहमीच सामाजिक भावनेतून समाजासाठी काम केले आहे. कामगारांबरोबरच समाजाच्या विकासासाठी योगदान देणे...
नगर - एक्साईज इंजिनिअरींग लि.कंपनीने नेहमीच सामाजिक भावनेतून समाजासाठी काम केले आहे. कामगारांबरोबरच समाजाच्या विकासासाठी योगदान देणे गरजेचे असून, या अनुषंगाने आम्ही व विद्यार्थी व विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी, तसेच रक्तगट तपासणीचा उपक्रम राबविला. जिल्हा परिषद शाळा ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या शाळांमध्ये समाजातील गोरगरीब व इतर मुले शिक्षण घेतात. त्यांच्या दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे आहेत, असे प्रतिपादन कंपनीने चीफ ऑपरेटिंग मॅनेजर सुब्रा सिन्हा यांनी केले.
गजानन कॉलनी, नवनागापूर येथील जिल्हा परिषद शाळेत एक्साईड इंजिनिअरींग लिमिटेड कंपनीच्या वतीने 350 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबीन व रक्तगट तपासणी करण्यात आली. यावेळे सिन्हा बोलत होते. ते म्हणाले की, एक्साईड कंपनीच्या वतीने शाळेच्या आवारात सुंदर असे उद्यान उभारण्याचा आमचा मानस आहे, तसेच शाळेसाठी सेफ्टी डोअर बसवून विद्युतीकरण करुन देण्यात येईल. या शाळेचे रंगरुप बदलण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असून, लवकरच हा बदल कंपनीच्या माध्यमातून घडविला जाईल.










