नगर - आज सर्वच क्षेत्र स्त्रीयांनी पादाक्रांत केले आहे. परंतु जुन्या रुढी परंपरांमध्ये आजही काही स्त्रीया गुंतलेल्या आहेत. त्यामुळे स्त्...
नगर - आज सर्वच क्षेत्र स्त्रीयांनी पादाक्रांत केले आहे. परंतु जुन्या रुढी परंपरांमध्ये आजही काही स्त्रीया गुंतलेल्या आहेत. त्यामुळे स्त्रीयांनी आपल्या स्वतःच्या प्रगतीबरोबरच इतर स्त्री लाही सन्मान दिला पाहिजे. स्त्रीयांनीच स्त्रीयांचा सन्मान केला पाहिजे. याची सुरवात ही स्त्री भ्रुण हत्या रोखण्यापासून करावी, असे आवाहन नगरसेविका नंदीनी कदम यांनी केले.
माळीवाडा येथे समझोता महिला मंडळ व नगरसेविका नंदीनी कदम यांच्यावतीने रथसप्तमीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास अन्य नगरसेविकांसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना सौ.कदम म्हणाल्या, स्वतःचे आरोग्य आणि आत्मसन्मान यासाठी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण केली पाहिजे. आज संस्कृती टिकाविण्याची मोठी जबाबदारी ही स्त्रीयांवरच आहे. समाजातील अनिष्ठ रिती रिवाजावर आवाज उठवला पाहिजे. स्त्रीयांनी एकमेकांचा हेवा करण्याऐवजी सन्मान करावा, असे आवाहन सौ.कदम यांनी केले.









