नगर - कर्ज मंजूरीतील शास्त्रशुध्द प्रक्रिया, क्षमतेचा विचार होवून कर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्णत्वास आल्यास कर्ज वसूलीचा बिकट मार्ग अनुसरण्...
नगर - कर्ज मंजूरीतील शास्त्रशुध्द प्रक्रिया, क्षमतेचा विचार होवून कर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्णत्वास आल्यास कर्ज वसूलीचा बिकट मार्ग अनुसरण्याची बँकांवर वेळ येणार नाही असे प्रतिपादन पुणे पिपल्स को-ऑप बँक या मल्टीस्टेट शे़ड्युल्ड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद दिक्षित यांनी केले.जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांसाठी नगर अर्बन को-ऑप बँकेच्या वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण सभागृहात कर्ज मंजुरी प्रस्तावाचे विश्लेषण, वितरण प्रक्रिया या विषयावरील प्रशिक्षणाचे वर्गाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र लोहाडे होते.
ग्रामीण भागात प्रथम कर्जदार मला किती कर्ज मंजूर करणार यांची खात्री पटल्यानंतरच कागदपत्राची पूर्तता करतो, मागितलेल्या कागदपत्रांचे त्यांना गांभिर्य नसते. कर्ज मंजुरी - वितरणासाठी त्यांची घाई चालू असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील बँकांना कर्ज मंजुरी प्रक्रिया शास्त्रशुध्द तत्वावर पूर्णत्वास न्यावी लागते. असे दिक्षित यांनी सांगितले. सदानंद दिक्षित यांनी विविध प्रत्याक्षिकाद्वारे विविध कृतीद्वारे कर्जाचे महत्व, कर्ज अर्ज प्रस्तावाचे, त्यातील आर्थिक पत्रकांचे व कागदपत्रांचे पृथ्थकरण विश्लेषणात्मक रित्या सांगून योग्य व कर्जफेडक्षमता कर्झवितरणासाठीच्या करावयाच्या विविध उपाययोजना व कृतिकारवाईची प्रशिक्षणार्थींना उद्बोधक माहिती दिली. जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील कर्ज मंजुरी - वितरण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नाथ राऊत यांचा प्रतिनिधीक सत्कार करणेत आला. याप्रसंगी सी.ए.अशोक पितळे व सी.ए. गिरिश घैसास यांची समयोचित भाषणे झाली.










