१० हजार चौरस फूट जागेचे मूल्य ठरवले अवघे कोटी महापालिका "स्थायी'' कडून कोटी ११ लाखांचा प्रीमियम निश्चित नगर- महापालिकेच्य...
१० हजार चौरस फूट जागेचे मूल्य ठरवले अवघे कोटी
महापालिका "स्थायी'' कडून कोटी ११ लाखांचा प्रीमियम निश्चित
नगर- महापालिकेच्या नगररचना विभागाने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या नेहरू मार्केटच्या १० हजार ६२ चौरस फूट जागेचे मूल्य अवघे कोटी २८ लाख रुपये निश्चित केले आहे. स्थायी समितीने देखील हे मूल्य ग्राह्य धरून या जागेवर खासगीकरणाच्या माध्यमातून भाजी मंडई व्यापारी संकुल बांधण्यासाठी केवळ कोटी ११ लाख रुपयांचा प्रीमियम निश्चित केला. त्यामुळे नेहरू मार्केटची ही माेक्याची जागा नाममात्र किमतीमध्ये बिल्डरच्या घशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भापती गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी उपायुक्त अजय चारठाणकर, भालचंद्र बेहेरे, शहर अभियंता अनिल पाटील यांच्यासह सहा सदस्य उपस्थित होते. नेहरू मार्केटच्या जागेचा प्रीमियम निश्चित करण्याचा महत्त्वाचा विषय सभेत मंजुरीसाठी ठेवला होता. मनपा प्रशासनाने २०१० मध्ये नेहरू मार्केट पाडले, तेव्हापासून शहराच्या मध्यवर्ती भागातील मोक्याच्या ठिकाणी असलेली मार्केटची तब्बल दहा गुंठे जागा ओस पडली आहे. या जागेवर खासगीकरणाच्या (एफबीटी) माध्यमातून भाजी मंडई व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला चितळे रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख कोटी ११ लाख रुपयांचा प्रीमियम निश्चित करून निविदा मागवली होती. परंतु सहा ते सात वेळा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा प्रीमियम निश्चित करण्याचा विषय पुन्हा एकदा स्थायी समितीसमोर आला. नगररचना विभागाने कोटी २८ लाख रुपये जागेचे मूल्य निश्चित केले. स्थायी समितीने चितळे रस्त्याच्या सुशोभीकरणासाठीची ५० लाखांची अट रद्द करत कोटी ११ लाख रुपयांचा प्रीमियम निश्चित केला. नवीन प्रीमियमनुसार नेहरू मार्केटच्या जागेवर भाजी मंडई व्यापरी संकुल उभारण्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यास प्रतिसाद मिळाला, तर लवकरच नेहरू मार्केटच्या जागेवरील भाजी मंडई व्यापारी संकुलाचा मार्ग मोकळा होणार आहे. असे असले तरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली नेहरू मार्केटची ही जागा नाममात्र किमतीत बिल्डरच्या घशात जाणार आहे. जागा विकसित करणाऱ्या बिल्डरला भाजी विक्रेत्यांसाठी ७० ओटे १२ गाळे द्यावे लागणार आहेत. त्यासाठी लागणारी बांधकाम किंमत भाजी विक्रेते संबंधित गाळेधारकांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे जागा विकसित करणाऱ्या बिल्डरचा दुहेरी फायदा होणार आहे.
१० गुंठेनेहरू मार्केटची एकूण जागा ०२ कोटी २८ लाख जागेचे बाजारमूल्य ०२ कोटी ११ लाख जागेचा निश्चित प्रीमियम बाजारमूल्य ते कोटी नेहरू मार्केटच्या दहा गुंठे जागेचे आजचे बाजारमूल्य किती असेल, यासाठी "दिव्य मराठी'ने शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधला. चितळे रोड परिसरात जागेचे दर प्रति चौरस फुटाला सहा ते सात हजार रुपये असल्याचे या व्यावसायिकांनी स्पष्ट केले. त्यामुळे नेहरू मार्केटच्या दहा गुंठे जागेचे मूल्य सहा ते सात कोटी असताना "नगररचना'ने हे मूल्य केवळ कोटी २८ लाख निश्चित केले. अवघ्या २८ मिनिटांत आटोपली सभा एरवी महत्वाच्या आर्थिक विषयांवर दोन ते तीन तास चालणारी स्थायीची सभा शनिवारी अवघ्या २८ मिनिटात आटोपली. नेहरु मार्केटच्या जागेच्या प्रिमियमबाबत सभेत अवघी दोन ते तीन मिनिटांची चर्चा झाली. प्रिमियमबाबत सभा सुरु होण्यापूर्वीच धोरण निश्चित करण्यात आले असल्याची चर्चा सुरु होती. नगररचना विभागाने कोणत्या आधारावर जागेचे मूल्य काढले, हा प्रश्न कायम आहे.
मनपाने बांधल्यास कोटी नेहरू मार्केटची सहा ते सात कोटी रुपयांची जागा बिल्डरच्या घशात घालण्यापेक्षा ही जागा महापालिकने स्वत:च विकसित करावी, अशी मागणी नागरिकांसह काही नगरसेवकांची आहे. मनपाने भाजी मंडई व्यापारी संकुल उभारल्यास त्यासाठी पाच कोटींचा खर्च लागेल. परंतु इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यातून मनपाला दुप्पट उत्पन्न मिळेल, परंतु मनपा स्वत:ही जागा विकसित करण्यास तयार नाही.










