नगर-गावकुसावरची शाळा... सर्वांचच दुर्लक्ष... ना पिण्याच्या पाण्याची सोय... झाडी नाही... शाळेचा परिसर हागणदारीने वेढलेला, शिक्षक नाक मु...
नगर-गावकुसावरची शाळा... सर्वांचच दुर्लक्ष... ना पिण्याच्या पाण्याची सोय... झाडी नाही... शाळेचा परिसर हागणदारीने वेढलेला, शिक्षक नाक मुठीत धरुन ज्ञानदानाचे काम करीत, सुविधा नाहीत म्हणून पालक आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत घालण्याच्या तयारीत...
येथील जिल्हा परिषदेच्या सारोळा बद्दी शाळेत दीड वर्षापूर्वी पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेले पोपट धामणे यांनी शाळेतील शिक्षिका श्रीमती शोभा कराळे, सविता नागरे, मंदाकिनी गाडेकर, माधवी गायकवाड यांच्या व मदतीने आणि शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या मदतीने शाळा विकास आराखडा तयार करुन त्याप्रमाणे निश्चित ध्येय ठरवून काम केले आणि गाव कुसाबाहेरची शाळा गावात आली. सर्वांना आपलीशी वाटू लागली, आज तिला आय.एस.ओ. मानांकनही मिळाले.
पहिली ते सातवी पर्यंतच्या या शाळेत प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम, पंखा, खिडक्यांना पडदे, गणित, विज्ञान, कला, कार्यानुभव, कोपरे इ.सुविधा दिल्या आहेत. शालेय आवारात एल.टी.च्या सहकार्याने 150 झाडे लावली आहेत. लोकसहभागातून खेळण्या, डिजिटल क्लासरुम, ठिबक सिंचन संच, विद्यार्थ्यांना झाडाखाली बसण्यासाठी सिमेंटची बाके, पिण्याच्या पाण्याची अद्ययावत सुविधा अशी दोन लाखापर्यंतची कामे करण्यात आली आहेत. परसबाग, सेंद्रियखत प्रकल्प, वाचनसंस्कार वर्ग, संगीतमय पाढे, प्रश्नमंजुषा विचार तुम्ही सांगतो आम्ही असे विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून सारोळा बद्दीच्या सरपंच सौ.मनिषा बोरुडे, उपसरपंच साहबराव बोरुडे माजी सरपंच भिमराज लांगडे, बोरुडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष बोरुडे तसेच मुख्य पोपट धामणे यांनी प्रमाणपत्र स्वीकारले व्यासपीठावर जि.प.सदस्य दत्तात्रय सदाफुले, गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ, केंद्रप्रमुख भिवसेन भोर होते.
शाळेला आय.एस.ओ. मानांकन मिळवण्यासाठी सेवा सोसायटीचे छत्रपती बोरुडे, ग्रा.पं.सदस्य सिदू ठोंबरे, बाबासाहेब बोरडे, बाळासाहेब बोरुडे, ग्रामस्थ आसिफ पठाण, बन्सी डाके, संतोष लांडगे, सुदाम बोरुडे, बाबासाहेब शेलार, प्रकाश बोरुडे, बापू बोरुडे, मुरलीधर बोरुडे गुरुजी, ग्रामसेवक अशोकराव जगदाळे, कृषी अधिकारी जावळे तसचे भगवान डहाणे, नवनाथ डाडर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अभियंत्यांचे सहकार्य - मानांकन मिळण्यात अभियंत्यांचीही मिळाली मोलाची साथ, अभियंता मधुकर चौधरी, भास्कर चेमटे, विजय बोदर्डे, राजेंद्र कुलांगे, कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, शिवलिंगप्पा अतनूर या सर्वांनी आर्थिक सहकार्य केले.










