कवी प्रा.शशिकांत शिंदे यांना आसराई साहित्य पुरस्कार प्रदान करतांना ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल. समवेत आबासाहेब कोकाटे,विठ्ठलराव कळमकर, ड...
![]() |
| कवी प्रा.शशिकांत शिंदे यांना आसराई साहित्य पुरस्कार प्रदान करतांना ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल. समवेत आबासाहेब कोकाटे,विठ्ठलराव कळमकर, डॉ.संजय कळमकर, रविंद्र सातपुते, सुनिल गोसावी आदि. |
नगर - साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या मातोश्री आसराई विठ्ठलराव कळमकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा दुसरा आसराई साहित्य पुरस्कार प्रसिद्ध कवी प्रा. शशिकांत शिंदे यांना ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
चिचोंडी पाटील (तालुका नगर) येथे मंगळवारी रात्री जेष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभास चित्रकार रविंद्र सातपुते, विठ्ठलराव कळमकर, डॉ.संजय कळमकर, शब्दगंधचे सुनील गोसावी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पूरस्कारचे स्वरुप आहे.










