नगर - जिल्हा परिषदेच्या खडकी ता.नगर येथील प्राथमिक शाळेला लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. त्यासाठी शाळेचे माजी ...
नगर - जिल्हा परिषदेच्या खडकी ता.नगर येथील प्राथमिक शाळेला लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. त्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकवर्गणी जमा केली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच असलेली ग्रामीण भागातील ही पहिलीच प्राथमिक शाळा ठरणार आहे.
खडकी शाळेच्या माजी विद्यार्थी व पालकांचा मेळावा, शाळेचे माजी विद्यार्थी व राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे नगर विभागाचे उपअधिक्षक सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्यास पंचायत समिती सभापती संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पुनम भिंगारदिवे, गट शिक्षणाधिकारी रामदास हराळ हे ही उपस्थित होते. गुणवत्ता व उत्कष्ट व्यवस्थापनाचे आय़.एस.ओ. प्रमाणपत्र तसेच जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या खडकी शाळेने विविध उपक्रम राबविण्यात सातत्य ठेवले आहे. शैक्षणिक पर्यटन केंद्र म्हणून या शाळेचा लौकीक वाढत असल्याने जिल्हाभरातून तसेच इतर जिल्ह्यातून ही शाळा पाहण्यासाठी अनेक पथकं येत आहेत. शाळेमुळे गावाचाही नावलौकिक वाढत असल्याने ग्रामस्थांचाही उत्साह वाढला आहे. त्यामुळे शाळेत विविध भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी हात पुढे केला आहे.
शाळेच्या या उपक्रमांचे तसेच ते राबिवणारे मुख्याध्यापक नामदेव धामणे, राजकुमार चोभे, नलीनी भुजबळ, शालेय व्यवस्थापन सिमतीचे अध्यक्ष विजय काळे यांचे सभापती संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ व उपस्थितांनी यावेळी कौतुक केले.
सीआयडीचे उपअधिक्षक सुभाष निकम यांनीही यावेळी शाळेसाठी 1 संगणक संच व पुढील 10 वर्षे विद्यार्थ्या्ंना वाचण्य़ासाठी वृत्तपत्रांची व्यवस्था केली. या मेळाव्यात सुमारे 30 हजारांची लोकवर्गणी जमा झाली.
मेळाव्यास सरपंच अर्चना कोठुळे, उपसरपंच रावसाहेब कोठुळे, अशोक कोठुळे, प्रविण कोठुळे, अनिल कोठुळे, संजय बहिरट, अनिल चोभे, भाऊ रोकडे, अजित कोठुळे, शायरा काळे, हर्षदा निकम, जनाबाई रोकडे, सिंधूताई कोठुले, रुपाली कोठुळे, सिवता कोठुले, रेवण कोठुळे, रंगनाथ कोठुळे, यांच्यासह माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक नामदेव धामणे यांनी केले. सुत्रसंचालन राजकुमार चोभे यांनी तर नलिनी भुजबळ यांनी आभार मानले.










