नगर - नुकत्याच रुपनगर, पंजाब येथे झालेल्या 61 व्या शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातून महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या श...
नगर - नुकत्याच रुपनगर, पंजाब येथे झालेल्या 61 व्या शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातून महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या श्रीराम विद्यालय राळेगण ता.नगर येथील कल्याणी बबन घोडके हिला या स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. महाराष्ट्राचा अंतिम सामना पंजाब बरोबर झाला. महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून देण्यात कल्याणीचा सिंहाचा वाटा होता. तसेच तैनाली, आंध्रप्रदेश येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय डॉचबॉल स्पर्धेत तुषार भाऊ कुलांगे यास सुवर्णपदक मिळाले, अंतिम सामना आंध्रप्रदेश बरोबर झाला. तसेच उज्जैन, मध्यप्रदेश येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीकोरोमन क्रीडा प्रकारात खुल्या गटातून खेळताना अक्षय बाबासाहेब भांबरे याने चमकदार कामिगरी केली. कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळणारा विद्यालयाचा प्रथम खेळाडू ठरला. या शैक्षणिक वर्षात विद्यालयाने संस्थेच्या सर्व शाखा शाळांमध्ये क्रीडा क्षेत्रात अव्वल स्थान मिळविले असून शालेय राज्यस्पर्धेत 28 खेळाडू तर एकूण 126 खेळाडूंनी राज्यस्तरावर दैदिप्यमान कामगिरी करत विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक विजय जाधव, राजेंद्र कोतकर तसेच धन्यकुमार हराळ यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष मा.माधवराव मुळे, उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव ज.ड.खानदेशे, सहसचिव सौ.दीपलक्ष्मी म्हसे, खजिनदार रा.ह.दरे, मुख्याध्यापक सुरेंद्र चव्हाण,सरपंच सौदीपाली भापकर, उपसरपंच अनिल पिंपळे,सुधीर पा.भापकर, सुभाष डावखरे, पै.शरद कोतकर, रवींद्र पिंपळे, भरत हराळ, रावसाहेब साबळे, सुनिल खराडे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.










