डेहराडून - हल्दवानीयेथे "द ग्रेट खली रिटर्न्स' शोमध्ये रेसलिंगच्या वेळी गंभीर जखमी झालेल्या महाबली खलीला बृजलाल रुग्णालयाच...
डेहराडून - हल्दवानीयेथे "द ग्रेट खली रिटर्न्स' शोमध्ये रेसलिंगच्या वेळी गंभीर जखमी झालेल्या महाबली खलीला बृजलाल रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. फाइटच्या वेळी तीन विदेशी मल्लांनी खलीला लाथाबुक्क्यांनी मारले. यानंतर एकाने खुर्चीने खलीच्या डोक्यावर, पाठीवर प्रहार केले. यामुळे खली गंभीररीत्या जखमी झाला. खलीला हेलिकाॅप्टरने एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ४४ वर्षीय खलीवर २४ तास लक्ष ठेवले जाईल. खलीच्या डोक्यास मोठी जखम झाली आहे. याशिवाय मान, छाती आणि डोक्यावरही जखमा झाल्या आहेत. खलीने पाठीच्या मणक्यातही खूप वेदना होत असल्याचे सांगितले. फाइटच्या वेळी कॅनडाची महिला रेसलर चेल्सीचा हाथसुद्धा फ्रॅक्चर झाला.
लोखंडीखुर्चीने मारहाण :खलीच्या डोक्याला सात टाके पडल्याचे आयोजकांनी सांगितले. फाइटच्या वेळी खलीने ब्रुडी स्टिलला रिंगच्या बाहेर फेकल्यानंतर विदेशी मल्ल माइक नॉक्स आणि अपोलो यांनी त्याच्यावर लोखंडी खुर्चीने हल्ला केला.










