नगर- संत रोहिदास महाराज यांची 639 वी जयंती संपूर्ण विश्वात साजरी होत आहे. संत रोहिदास महाराज सेवा संघाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आ...
नगर- संत रोहिदास महाराज यांची 639 वी जयंती संपूर्ण विश्वात साजरी होत आहे. संत रोहिदास महाराज सेवा संघाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती संतोष वडोदे यांनी दिली.
जयंती दिनी सोमवार दि.22 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 9 वा. प्रतिमा पुजन करुन मिरवणुक छबुराव लांडगे चौक, भिंगारवाला चौक, आशा टॉकीज, पंचपीर चावडी, माळीवाडा, इंपिरियल चौक, शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व चर्मकार बांधवांनी विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सेवा संघाकडून करण्यात आले आहे.










