नगर - जन्माला आलेल्या प्रत्येकाकडे सामाजिक भान असते, प्रत्येकात एक लीडर लपलेला असतो आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण असतात. प्रखर ...

नगर - जन्माला आलेल्या प्रत्येकाकडे सामाजिक भान असते, प्रत्येकात एक लीडर लपलेला असतो आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण असतात. प्रखर इच्छाशक्ति असेल तर स्वतःला लीडर म्हणून घडविता येते असे प्रतिपादन जिज्ञासा अकादमीचे संस्थापक व यशदाचे राष्ट्रीय मानद प्रशिक्षक प्रा.विठ्ठल बुलबुले यांनी केले.
जिज्ञासा अकादमीच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्ताने नेतृत्व व विकास कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रा.विठ्ठल बुलबुले बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक विजयसिंह होलम यांच्या शुभहस्ते कऱण्यात आले होते तर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके हे होते. उद्घाटक म्हणून बोलतांना विजयसिंह होलम म्हणाले की, कार्यकर्ता किंवा लीडर घडवावा लागतो वेगवेगळ्या आंदोलनातून लीडरशिप घडत असते, आजकाल फ्लेक्सबाजी, पत्रकबाजी मधून नेता निर्माण होतांना दिसतो आहे अशा काळात कार्यकर्ता नेतृत्व विकासासाठी कार्यशाळा घेतली जात आहे हे अनुकरणीय आहे.
सुधीर लंके म्हणाले की, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, कौटुंबिक अशा अनेक क्षेत्रात लीडरची गरज असते लीडर होऊ इच्छिणारे जे कोणी असतील त्यांनी या देशाची राज्यघटना प्रमाण मानून इथल्या शोषित वर्गासाठी लढे उभे करावीत. या एकदिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रातील 70 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.









