नगर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या 386 व्या जयंतीनिमित्त नगर शहरात भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या स्पर्धेमध्ये सर्व ना...
नगर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या 386 व्या जयंतीनिमित्त नगर शहरात भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या स्पर्धेमध्ये सर्व नागरीक भाग घेऊ शकतात. प्रथम क्र.1000 रु. व्दितीय-750 रु., तृतीय-500 रु. अशी रोख बक्षीसे देऊन प्रशस्तीपत्रक, पुस्तके देण्यात येतील, अशी माहिती मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजित वाघ यांनी दिली.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपल्या घरासमोर स.10 वाजेपर्यंत रांगोळी काढून खालील नंबरवर दि. 18 पर्यंत संपर्क साधून नोंदवावी. परिक्षक स्वतः येवून परिक्षण करतील, निकाल लागल्यानंतर विजेत्यांना संपर्क साधून बक्षिसे देण्यात येतील.
यासाठी अदित्य मचे (मो.8857033220), सुबोध फुंदे (9175877773), इंजि.अभिजित एकनाथ वाघ (8275201481) व स्वप्नील पाठक (8087480442) यांच्याकडे प्रवेश नोंदणी करावी, अशी माहिती वाघ यांनी दिली.










