अहमदनगर - श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड, आदर्शगांव मांजरसुंबा ता.जि.अहमदनगर येथे तारीख 10 फेब्रुवारी 2016 रोजी धर्मनाथ बिजेचा उत्सव आयोजित क...
अहमदनगर - श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड, आदर्शगांव मांजरसुंबा ता.जि.अहमदनगर येथे तारीख 10 फेब्रुवारी 2016 रोजी धर्मनाथ बिजेचा उत्सव आयोजित करण्यात आलेला होता. त्यानिमित्त सकाळी 8 ते 10 या वेळेत नाथभक्तांचे हस्ते श्री गोरक्षनाथांची विधीपुर्वक पुजा करुन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 10 ते 12 या वेळेत मोरया चिंचोरा ता. नेवासा येथील भजनी मंडळाचे वतीने ह.भ.प. कारभारी महाराज झरेकर यांचा जाहिर किर्तनाचा कार्यक्रम साजरा होऊन तद्नंतर नाथ भक्त श्री सावंत गुरुजी (भोर) पुणेकर मित्रमंडळ व इतर अन्नदाते यांचे मार्फत भावीकांना मांजरसुंबा गावचे सरपंच जालींदर कदम, देवस्थानचे अध्यक्ष, अॅड.शंकरराव कदम, उपाध्यक्ष जयराम कदम, खजिनदार मारुती कदम तसेच गावातील ग्रामस्थ परिसरातील हजारो नाथ भक्त तसेच भजनी मंडळी उपस्थित होते. सदर प्रसंगी देवस्थानचे सचिव श्री गोरक्षनाथ कदम यांनी देवस्थानचे विकासाबाबत भावीकांना माहिती दिली. तसेच देवस्थानच्या वतीने पर्यटन खात्याकडे दहा कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच शासनास सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानचे वतीने प्रत्येक रविवारी भावीकांचे वतीने अन्नदान सुरु असून त्यासाठी नाथ भक्तांनी देवस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.










