नगर- श्री महादेव प्रतिष्ठान आयोध्यानगरी आयेाजित श्रीराम चौकात महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्या...
नगर- श्री महादेव प्रतिष्ठान आयोध्यानगरी आयेाजित श्रीराम चौकात महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 1 मार्च 16 पासून वृंदावनचे श्री कन्हैय्यालाल शास्त्रीजी यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय भागवत कथा आयोध्यानगरी येथील महादेव मंदीर प्राणंगणात दररोज सायं. 6 ते 8.30 पर्यंत होणार आहे. कथेनंतर रोज 8.30 वा.महाआरती होइल. महाआरतीला शहराचे आजी आमदार संग्राम भैय्या जगताप, माजी आमदार अनिल भैय्या राठोड, नगरसेवक, मान्यवर व्यक्ती उपस्थित राहतील.
मंगळवार दि.8 मार्च 16 रोजी भागवत कथा सप्ताहाची सकाळी 11 काल्याचे किर्तनाने सांगता होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी सावेडी उपनगरातील भाविकांनी या भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.










