बंधू,भगिनी व भिंगारवासीय माजी विद्यार्थी, भिंगार हायस्कूल, भिंगार सन 13 ऑगस्ट 1962 साली कै.भाऊराव महादू धाडगे व कै.डॉ.गजानन बळवंतराव देश...
बंधू,भगिनी व भिंगारवासीय माजी विद्यार्थी, भिंगार हायस्कूल, भिंगार सन 13 ऑगस्ट 1962 साली कै.भाऊराव महादू धाडगे व कै.डॉ.गजानन बळवंतराव देशमुख या दोघांनी शिक्षणासारख्या पवित्र कार्याला उदार अंतःकरणाने 5 एकर 17 गुंठे जमीन बक्षीसपत्राने दिली. पूर्वीची शाळा रंगर गल्लीत कै.बापूसाहेब बारटक्के यांच्या इमारतीत भरत होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वरील दोन ज्ञान महर्षी यांनी विद्यार्थ्यांची सोय चांगल्या प्रकारे होण्यासाठी सदरची जागा अहमदनगर एज्युकेशन सोसायटीला बक्षिसपत्राने दिली. त्यावेळी जागेचा वापर फक्त शैक्षणिक कारणासाठी केला जावा ही अट बक्षिस पत्रात ठेवून जागा दिली व बक्षिसपत्र तयार केले. परंतु सदर जागेचा वैयक्तिक व व्यावसायिक हेतूने वापर होत असल्याचे सौ.आसरा भाऊसाहेब धाडगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अहमदनगर, शिक्षणाधिकारी (माध्य.)शिक्षण उपसंचालक, आय़ुक्त जिल्हा परिषद, अहमदनगर, संस्थेचे अध्यक्ष वगैरे यांना निवदने पाठविली असून वरील गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य गावच्या लेकीला सर्वांनी यावे असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.










