नगर- येथील लेखक टी.एन.परदेशी यांच्या ‘गर्भगिरीतील नाथपंथ’ या पुस्तकास कै.निखिल एकनाथराव खडसे स्मृती साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आह...
नगर- येथील लेखक टी.एन.परदेशी यांच्या ‘गर्भगिरीतील नाथपंथ’ या पुस्तकास कै.निखिल एकनाथराव खडसे स्मृती साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. उत्तर महाराष्ट्र साहित्य सभा नाशिकच्या वतीने जळगाव येथे आयोजित तिसर्या साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष तथा महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते हा पूरस्कार टी.एम.परदेशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे व उद्घाटक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते.
पंधरा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पूरस्काराचे स्वरुप आहे. परदेशी यांची कौतुकी (काव्यसंग्रह) प्रतिसाद व आज मितीला (लेखसंग्रह) यासह 8 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘गर्भगिरीतील नाथपंथ’ या ग्रंथात त्यांनी सोनई ते येवलवाडी (जिल्हा बीड) या 115 किलोमिटरच्या गर्भगिरीतील डोंगर भागातील सर्व नाथक्षेत्रांचा संशोधनात्मक परिचय करुन दिला आहे. या सर्व स्थांनाचा एकत्रितपणे वेध घेणारा या प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या क्षेत्रातील जिज्ञासू , अभ्यासक, पर्यटक, व नाथसांप्रदायिकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल आणि गर्भगिरीतील पर्यटन वाढीसाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. ठाणे (पूर्ण) येथील अनघा प्रकाशनाच्या वतीने हा ग्रंथ प्रकाशीत करण्यात आला आहे.
टी.एन.परदेशी यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल नगर जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.










