श्रीगोंदा तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली भदे यांना नियुक्ती पत्र देतांना जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा. समवेत संघ...
![]() |
| श्रीगोंदा तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली भदे यांना नियुक्ती पत्र देतांना जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा. समवेत संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे पा.आदी. |
श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सौ.वैशाली वामन भदे यांची नियुक्ती करण्यात आली. जि.प.च्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पा.यांच्या उपस्थितीत संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौ.कांचन मांढरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. गुरुवारी (दि.18)नगर येथील जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात सौ.मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला कॉंग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सौ.भदे सह विविध तालुक्यातील महिलांना पदनियुक्तीचे पत्र देण्यात आले.










