Archive Pages Design$type=blogging

मार्चअखेर जिल्ह्यातील सर्व पोस्टांत सीबीएस : प्रवर अधीक्षक गायकवाड

नूतन प्रवर अधीक्षक ए. व्ही. गायकवाड यांचा सत्कार करताना सचिन गायकवाड, संतोष यादव, रामभाऊ लांडगे. समवेत ए. डी. टेकाळे, जी. आर. कत्ते,...

नूतन प्रवर अधीक्षक ए. व्ही. गायकवाड यांचा सत्कार करताना सचिन गायकवाड, संतोष यादव, रामभाऊ लांडगे. समवेत ए. डी. टेकाळे, जी. आर. कत्ते, पी. एस. जोशी, राजेंद्र कोतकर, व्ही. एस. गायकवाड आदी. छाया: उदय जोशी. 
तब्बल चार महिन्यांनंतर मिळाले प्रवर अधीक्षक
नगर (एलएसएस प्रतिनिधी) - जिल्ह्यातीलसर्व पोस्ट कार्यालयांमध्ये मार्चअखेर कोअर बँकिंग सेवा (सीबीएस) सुरू होईल, अशी माहिती प्रवर अधीक्षक ए. व्ही. गायकवाड यांनी सोमवारी दिली.
गायकवाड यांनी प्रवर अधीक्षकपदाचा पदभार प्रभारी प्रवर अधीक्षक जी. आर. कत्ते यांच्याकडून स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नगर डिव्हिजनमध्ये आतापर्यंत ५० पैकी ३६ पोस्टांमध्ये सीबीएस सेवा सुरू झाली आहे. उर्वरित पोस्ट कार्यालयांत मार्चअखेरपर्यंत सीबीएस सेवा सुरू होईल. प्रधान डाकघरमध्ये नुकतीच एटीएम सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा त्रास वाचणार आहे. वर्षभरानंतर पोस्टाचे एटीएम इतर बँकांच्या एटीएममध्ये वापरता येईल.
प्रवर अधीक्षक एस. एस. शिरसी यांची ऑक्टोबरमध्ये बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. सध्या श्रीरामपूर विभागाचे प्रवर अधीक्षक जी. आर. कत्ते यांच्याकडे पदभार होता. आता तब्बल चार महिन्यांनंतर पूर्णवेळ प्रवर अधीक्षक उपलब्ध झाले. गायकवाड हे पुणे शहर पूर्व विभागात प्रवर शहर अधीक्षक होते. त्यांनी पुणे येथे सहायक डाक निदेशक, मुंबई, तसेच कर्नाटक सर्कलमध्ये काम केले आहे.
गायकवाड यांनी सोमवारी पदभार घेतल्यानंतर त्यांचा वरिष्ठ पोस्ट मास्तर ए. डी. टेकाळे, नॅशनल युनियनचे राज्य उपाध्यक्ष रामभाऊ लांडगे, नॅशनल युनियनचे विभागीय सचिव संतोष यादव, नॅशनल युनियचे विभागीय अध्यक्ष पी. एस. जोशी, पोस्टल रिक्रिएशन क्लबचे सचिव सचिन गायकवाड, व्ही. एस. गायकवाड, राजेंद्र कोतकर, प्रकाश कदम, संजय बोंदर्डे आदींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: मार्चअखेर जिल्ह्यातील सर्व पोस्टांत सीबीएस : प्रवर अधीक्षक गायकवाड
मार्चअखेर जिल्ह्यातील सर्व पोस्टांत सीबीएस : प्रवर अधीक्षक गायकवाड
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcIqU8sM266Rzc8WR0Qa6FXGkUFYr43uVcs4vJGicEIk4530ek0jjV2wdjFBQg4RUznaz8dOJVMAkp1X4GRpqq7wHvcwW5t_GKiYFqaTh2F4jCfU5tjEcjxvvrXnHlSW-F-J5RNx9LRx8U/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcIqU8sM266Rzc8WR0Qa6FXGkUFYr43uVcs4vJGicEIk4530ek0jjV2wdjFBQg4RUznaz8dOJVMAkp1X4GRpqq7wHvcwW5t_GKiYFqaTh2F4jCfU5tjEcjxvvrXnHlSW-F-J5RNx9LRx8U/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_78.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_78.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago