के के आय बुधराणी हॉस्पीटल पुणे व वैष्णव मित्र मंडळ फुलसौंदर मळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया ...

के के आय बुधराणी हॉस्पीटल पुणे व वैष्णव मित्र मंडळ फुलसौंदर मळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया व उपचार व रक्तदान शिबीराचे आयोजन दि. 1 माचर् 2016 रोजी सकाळी 9 ते 2 वाजता शिवपंचायतन मंदिर फुलसौंदर मळा, बुरुडगांव रोड येथे कऱण्याचे आयोजित केले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले आहे.
या शिबीराला मा.आ.अनिल भैय्या राठोड, संभाजी कदम व जालींदर बोरुडे आदि मान्यवर उपस्थित राहणार असून शिबीरार्थींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना जेवण, प्रवास, औषधे, गोळ्या, काळा चष्मा मोफत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ परिसरातील सर्वांनी घ्यावा असे आवाहन भगवान फुलसौंदर संपर्क मो.नं.9422222236, नन्नवरे साहेब, भास्करराव गायकवाड, अरुण फुलसौंदर, राजु फुलसौंदर, दिलीप माडगे, विष्णुपंत फुलसौंदर, अवधुत फुलसौंदर व मच्छिंद्रनाथ मित्र मंडळ बुरुडगांव रोड आदिंनी केली.









