महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक विभागाची सहविचार सभा शनिवार दिनांक 27/02/2016 रोजी दुपारी 12.00 वा.आनंद विद्यालय, गुलमोहर रोड, अ....

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक विभागाची सहविचार सभा शनिवार दिनांक 27/02/2016 रोजी दुपारी 12.00 वा.आनंद विद्यालय, गुलमोहर रोड, अ.नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.शहर बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, म.रा.शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते (कोकण वि भाग) आमदार ना.गो.गाणार (नागपूर विभाग) तसेच मा.आ.संजिवणीताई रायकर मा.आ.भगावानराव साळखे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब काळे, आदि उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सदर बैठकीत विना अनुदानित माध्य.प्राथ. शाळा व तुकड्यांना अनुदान मिळणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनीच पेन्शन योजना लागू करणे यासह अन्य मागण्यांवर चर्चा होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र शिक्षक परिषद नाशिकचे अध्यक्ष आ.सुमित पंडित यांनी दिली आहे.









