नगर - शहरातील वाहतुकीची कोंडी आणि अपघाताची वाढती संख्या कमी कऱण्यासाठी पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कल्याण, मनमाड या महाभागातील जोडणारे बा...
नगर - शहरातील वाहतुकीची कोंडी आणि अपघाताची वाढती संख्या कमी कऱण्यासाठी पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कल्याण, मनमाड या महाभागातील जोडणारे बाह्यवळण रस्ते तयार करण्यात आले असले तरीही बाह्यवळण रस्त्यांवरही चौफुल्यांच्या ठिकाणी गतिरोधके व वाहतुक नियंत्रण दिवे (सिग्नल) तातडीने बसविण्यात यावेत. अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथमामा खंडागळे यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात खंडागळे यांनी म्हटले आहे, की शहरातील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आजही भेडसावत आहे. शहर आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आतापर्यंत अनेक निष्पापांचे नाहक बळी गेले. गेल्या चार दिवसात तीन-चार अपघात घडले असून केडगाव चौफुल्यावर दोन दिवसापुर्वीच एस.टी.बस अपघातात 25 जण प्रवासी जखमी झाले. त्या शिवाय इतर चौफुल्यावरही अवजड व अन्य वाहनांमध्ये छोटे-मोठे अपघात घडले आहेत. या मागण्यासंदर्भात प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.










