नगर- एकदंत गणेश मंदिरातर्फे सोमवार दि.8 फेब्रुवारी 2016 रोजी स.10 ते 2 या वेळेत दातरंगे मळा, एकदंत कॉलनी, अ.नगर येथे मोफत नेत्रतपासणी,...
नगर- एकदंत गणेश मंदिरातर्फे सोमवार दि.8 फेब्रुवारी 2016 रोजी स.10 ते 2 या वेळेत दातरंगे मळा, एकदंत कॉलनी, अ.नगर येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले.
के.के.आय.बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. नेत्रतपासणीपासून ते मोतीबिंदू पर्यंतचे सर्व सोपस्कार मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये रुग्णांचा नगर ते पुणे प्रवास, भोजन, निवास व काळा चष्मा आदि बाबींचा समावेश आहे, शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांवर पुण्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णांनी शिधा पत्रिका झेरॉक्स सोबत आणावी, सध्या चालू असलेले औषध व गोळ्याही बरोबर आणाव्यात.
रुग्णांसाठी नावनोंदणी आवश्यक असून जालिंदर बोरुडे मो.9881810333, अमित आसाल मो.9970857505, अजय इराबत्तीन मो.8149632770, श्रीनिवास बुरगुल मो.8421331338 यांच्याशी संपर्क साधावा. तरी रुग्णांनी या मोफत तपासणी शिबिराचा व शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.










