पुणे येथे 20 वर्षापासून कार्यरत असलेल्या निलिमा नृत्यालय या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अविरतपणे कत्थक नृत्याचा प्रसार आणि प...

पुणे येथे 20 वर्षापासून कार्यरत असलेल्या निलिमा नृत्यालय या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अविरतपणे कत्थक नृत्याचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या मान्यवरांना कलार्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात अ.नगर मधील कलाकारांना योग्य दिशा देऊन अ.नगर चे नाव महाराष्ट्र व महाराष्ट्र व देशपातकळीवर आणणे व कलेच्या प्रसारासाठी अ.नगरच्या प्रिया ओगले जोशी यांना कलार्पण पुरस्कार देण्यात आला.
यात भव्य स्मृतिदिन, शाल व पुणेरी पगडी असे बक्षिसाचे स्वरुप आहे. या कार्यक्रमात नृत्यक्षेत्रातील अतिशय ज्येष्ठ व श्रेष्ठ, मानद गुरुंचा सन्मान करण्यात आला. त्यात गुरु सौ.सुजाता नातु, , गुरु सौ. रोशन दाते, मनिषा साठे, नंदकिशोर कपोते व कथ्थक समर्पण पुरस्कार सौ.क्षमा भाटे यांना देण्यात आला. 19 फेब्रु.2016 ला टिळक स्मारक येथे हा सोहळा संपन्न झाला. माझ्या या वाटचालीत माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या व मार्गदर्शकांची मी सदैव ऋणी आहे असे प्रिया ओगले यांनी सत्कारास उत्तर देतांना सांगितले.









