Archive Pages Design$type=blogging

शैक्षणिक प्रगतीमुळेच पारनेरकरांची विविध क्षेत्रात भरारी-मा.आमदार दादाभाऊ कळमकर

नगर- शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. पारनेर तालुका कायम दुष्काळी असून, येथील माणसांना बुध्दीची देणगी लाभली असून, शिक्षणामुळेच सर्वदूर ...


नगर- शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. पारनेर तालुका कायम दुष्काळी असून, येथील माणसांना बुध्दीची देणगी लाभली असून, शिक्षणामुळेच सर्वदूर मोठ्या पदावर पारनेरकर दिसतात. प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी व्यवसाय व उद्योगामध्ये उंच भरारी मारली आहे, असे प्रतिपादन मा.आ.दादाभाऊ कळमकर यांनी पारनेर परिवार स्नेहमेळाव्यात केले. 
मार्केट यार्ड मधील हमाल पंचायत भवन येथे पारनेर परिवार मित्र मंडळातर्फे स्नेहमेळावा कार्य़क्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
पारनेर परिवार मित्र मंडळातर्फे नुकताच स्नेहमेळावा तिळगुळ समारंभ व महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ पार पाडला. परिवाराचे अध्यक्ष तारकराम झावरे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सेनापती बापट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ.जयश्री झावरे यांच्या भजनी मंडळाने भजन संध्या हा सुमधूर कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिव प्रा.किसनराव पायमोडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सदानंद सोनवणे यांनी केले. अहवाल वाचन आर्कि दत्तात्रय शेळके यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संकल्पपूर्ती या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. सदर पुस्तिकेत नगरस्थीत पारनेकरांची आजिवन सभासद सूची व अहवाल देण्यात आला. मुळचे पारनेर रहिवाशी असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गतवर्षी पानरेर भूषण देऊन गौरविलेले महापौर अभिषेक कळमकर, शंकरराव घुले, चहाळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.जगदीश चहाळ, डॉ.मिनाक्षी चहाळ, सौ.पवार यांची भाषणे झाली.
यावेळी पारनेर तालुक्यातील अनेक मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती. यात मा.नगरसेवक ज्ञानदेव पांडूळे, वैभव इंडस्ट्रीज प्रमुख मधुकर रोहकले, गणेश इंडस्ट्री प्रमुख अलभरशेठ, संजय खामकर, डॉ.कोल्हे, देवराम ठुबे, हवालदारसर, सौ.कळमकर आदि मान्यवर उपस्थित होते. आभार डॉ.दिलीप मोटे यांनी मानले. प्रा.संजय दुधाई, सुरेश थोरात व संपत येणारे यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: शैक्षणिक प्रगतीमुळेच पारनेरकरांची विविध क्षेत्रात भरारी-मा.आमदार दादाभाऊ कळमकर
शैक्षणिक प्रगतीमुळेच पारनेरकरांची विविध क्षेत्रात भरारी-मा.आमदार दादाभाऊ कळमकर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAxTdDW2ctLjUiVcmqebaP0hnq0hLxQCFhn0pW_gWzexMyAvgFYbtMpF7tJqFxPFhiaU9gECaTFPhsQWmUb0K_VgVa3z0Wn8fg6Fid-b-2sWyzs_xKgEKxul6xULEpUfZJCsQ3fNVkY9co/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAxTdDW2ctLjUiVcmqebaP0hnq0hLxQCFhn0pW_gWzexMyAvgFYbtMpF7tJqFxPFhiaU9gECaTFPhsQWmUb0K_VgVa3z0Wn8fg6Fid-b-2sWyzs_xKgEKxul6xULEpUfZJCsQ3fNVkY9co/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_80.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_80.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago