नगर - पाश्चात्य संस्कृतीच्या मोहजालात भारतीय समाज वाहण्याची भिती निर्माण झाली असून ग्रंथांमुळेच समृध्द आणि संपन्न समाजाची निर्मिती होत अस...
नगर - पाश्चात्य संस्कृतीच्या मोहजालात भारतीय समाज वाहण्याची भिती निर्माण झाली असून ग्रंथांमुळेच समृध्द आणि संपन्न समाजाची निर्मिती होत असते, प्रतिभासंपन्न पिढी घडविण्यात ग्रंथालयाचे मोलाचे योगदान आहे त्यामुळे आज राज्याला मंदिराची नव्हे तर खऱ्या अर्थाने ग्रंथालयाची गरज असल्याचे प्रतिपादन विख्यात सिने गीतकार कवी बाबासाहेब सौदागर यांनी केले. दि. 10 पासून सलग तीन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सव 2016 चे उद्घाटन सौदागर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते, समारंभाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एच.पालवे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंढे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, आकाशवाणीचे प्रमुख प्रदीप हलसगीरकर, ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे, प्रा.शिरीष मोडक, प्रा.मेधाताई काळे, नगरसेवक सुवेंद्र गांधी उपस्थित होते.इंग्रजी ही आमच्या वडीलांची मानलेली मेव्हणी असल्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर आम्हाला तीचे बोट धरल्याशिवाय पर्य़ाय नाही. तरी या गदारोळात आईला विसरु नका असे भावनिक आवाहन सौदागर यांनी केले.यावेळी अध्यश्रीय भाषणात जिल्हाधिकारी बी.एच.पालवे यांनी सांगितले की, मी अत्यंत सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्ती असून ग्रामीण भागातून आज या पदापर्यंत पोहचलो तो केवळ वाचनामुळे महिनाभरापुर्वी शासनाने चॅनलसंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर आलेल्या प्रतिक्रियांवरुन नागरिकांवर वाहिन्यांचा जबरदस्त प्रभाव असल्याचे जाणवले. या मोहजालातून त्यांची सुटका करण्यासाठी वचनसंस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता आहे. हे काम अशा ग्रंथोत्सवातून साध्य व्हावे, प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंढे यांनी ग्रंथोत्सवाचा उद्देश विषद करुन जिल्हाभरात एकूण 514शासनमान्य ग्रंथालये कार्यरत असल्याचे सांगितले.प्रारंभी दीपप्रज्वलनाने उत्सवाचे उद्घाटन होऊन कु.तेजस्विनी मालंजकर हिच्या सुमधून स्वागत गिताने सोळ्यास सुरवात झाली. यावेळी बाळासाहेब अरगडे यांनी वाचनालयाच्या विविध समस्या मांडल्या. तसेच मागण्यांचे निवेदन अति जिल्हाधिकारी पालवे यांना देण्यात आले. कार्यक्रमास साहित्यिक लिलाबाई गोविलकर, क्रांतीकला अनभुले, संदिप काटे, नामदेव गरड, जगन्नाथ गोसावी, कुंडलिक घुगे, शिवाजी गायकवाड, अकबर सय्यद, छोटू लड्डा, लक्ष्मण सोनाळे, विजय डोळ, समाधान पाटील, सुरेश हराळ, पनाजी कदम, पुष्पा नाईकवाडे, संतोष दहिफळे, हरिश्चंद्र वांढेकर, पोपट
उगले, चंद्रकांत सरोदे, बाळासाहेब अरगडे, संजय लिहिणे, संदीप रणनवरे, विमल कदम, राजेंद्र तरटे, मिरा काकडे, यशवंत कुलकर्णी, विष्णू वाघ, शिवाजी घाडगे यांच्यासह जिल्ह्याभरातून ग्रंथालयाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती तिलोतमा गोडबोले यांनी केले तर आभार कवी चंद्रकांत पालवे यांनी मानले.










