करंजी (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील सोळा शाळा आयएसओने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी दि...
करंजी (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील सोळा शाळा आयएसओने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी दिली आहे. तालुक्यातील अनेक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी शाळा डीजिटल व आयएसओ करण्यासाठी कंबर कसली आहे. तालुक्यातील व शाळेचा पट, गुणवत्ता वाढीसाठी प्रत्येक शिक्षकाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरच खासगी शाळांचे वाढते प्रमाण रोखता येईल. तालुक्यातील सातवड, देवराई, भडकेवस्ती, कासारवाडी, मढी, करडवाडी, निवडुंगे, चितळेवस्ती, ढवळेवाडी, पाडळी, जवखेडे खालसा, राघोहिवरे, मोहज खुर्द सह एकूण सोळा शाळा आयएसओ झाल्या आहेत.
शाळा आय.एस.ओ. करण्यासाठी प्रत्येक गावच्या ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्वाचा ठरला. त्यांनी लावलेला आर्थिक हातभार मोठा होता. शिक्षकांनी सुध्दा प्रामाणिकपणे वाढीव तास शाळेसाठी देवून शाळा नावारुपाला आणल्या. यापुढेदेखील असेच चांगले वातावरण ठेवण्याचे मोठे आवाहन या मानांकन मिळालेल्या शिक्षकांवर राहणार आहे. उपसभापती बेबीताई केळगंद्रे, शिक्षणविस्तार अधिकारी अनिल भवार यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ यांचे योगदान लाभले म्हणून 16 शाळा मानांकन मिळाले. यापुढे आणखी शाळा मानांकनास प्राप्त होतील, असे सभापती पालवे यांनी सांगितले.










