नगर - नगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने कष्टकऱ्यांसाठी कान, नाक व घसा तपासणी शिबीराच्या माध्यमातून जी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, कष्ट...
नगर - नगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने कष्टकऱ्यांसाठी कान, नाक व घसा तपासणी शिबीराच्या माध्यमातून जी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, कष्टकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. भविष्यामध्ये अनेक अडचणींना कष्टकऱ्यांना सामोरे जावे लागते, त्यासाठी स्वतःहून आरोग्याची काळजी घेतल्यास मोठ्या आजारापासून लांब राहू शकतो. हमाल पंचायत कष्टकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात अग्रेसर असून, त्याचा फायदाही त्यांना होत आहे, असे प्रतिपादन अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांनी व्यक्त केले.
नगर जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने कान, नाक व घसा तपाणी शिबिराचे उद्घाटन अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले, डॉ.सोनाली बांगर, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, कॉ.बाबा आरगडे, अशोक जोशी, पांडूरंग गुंजाळ, बापूसाहेब बडे, सतीश शेळके, बाळासाहेब वडागळे, संजय महापुरे, नंदू डहाणे, अजिम सय्यद, डॉ.जाधव, सचिन ठुबे आदि उपस्थित होते.
तसेच अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी शैलेश मुनोत यांची निवड झाल्याबद्दल हमाल पंयाचतीच्यावतीने शंकरराव घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक बाबर, श्रीमती लक्ष्मीबाई कानडे, रोहिदास बनसो़डे, नवनाथ बडे, किसन नवले, रावसाहेब दराडे, अशोक जायभाय, मोहन सापते, बबन अजबे, नारायण गिते, अनुरथ कदम, शेख म्हमुलाल, दत्तात्रय भोजने, लक्ष्मण वायभासे, रासकर आदिंसह हमाल, मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









